Deepamani Arts

Go to content

Main menu

दुनियेतील सर्व दुःखांच परिमार्जन करण्याचं सामर्थ्य मातृस्पर्षात आहे.  अशी माझी मातोश्री, जीवनाच्या काटेरी पाऊलवाटेतून कुठल्याही प्रकारची इजा न होता तारून नेणारे परमपुज्य महान संत वडील ज्यांच्या आशिर्वादाने हे कष्टमय जीवन सन्मानाने जगत आहे, असे माझे मातृपितृ देव, कै. तानुबाई व कै. श्रीमान पिराजी विठ्ठल नागणे बुवा यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन...

 

माझं माझं म्हणून कोणी आपल होत नसतं.
म्हणून संसारात वावरताना स्वतःला विसरायच असतं.
                 हृदय असणार्‍यांपासून स्वार्थी दूर पळतात.
                 कारण हृदयाच्या वेदना फक्त हृदयालाच कळतात.

दुसर्‍याच्या विश्वासावर स्वतःच घर मोडायचं नसतं.
जळणार्‍याला काय वेदना होतात हे जाळणार्‍याला कळत नसतं.
                 घराचं घरपण राखण्यासाठी सर्वांनी झटायचं असतं.
                 'मी - माझा संसार' म्हणण्यापेक्षा 'आपलं घर' म्हणायच असतं.

दुसर्‍याच्या सुखात, आपलं सुख शोधायचं असतं.
स्वतःच्या दुःखाच्या खाईत दुसर्‍याला लोटायचं नसतं.
                 अपयशाने खचायचं नसतं. यशानं भुलायचं नसतं.
                 यशापयशाच्या वाटेवर चालताना, ध्येय मात्र सोडायचं नसतं.

काळजावरचे घाव अश्रुंनी पुसत नसतात.
हसतमुखाने वार झेलणारे कधीच रडत नसतात.
                  आपल्या हाती काहीच नसतं, जीवनाला मृत्युच लेबल असतं.
                  आणि म्हणूनच माझं माझं म्हणून, कोणी आपलं होत नसतं.

Back to content | Back to main menu